Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पालकांनी पर्यावरण रक्षणाची बांधिलकी दृढ करावी – अरुण चाबुकस्वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/22-01-2020-.-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी ‘स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्येय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे’ या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वच्छता, प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषण बाबत पृथ्वी रक्षणाच्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली.
“शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी पर्यावरण रक्षणविषयीची आपली बांधिलकी दृढ केली पाहिजे, असे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पांडे यांनी तर आभार अनुराग यादव यांनी मानले.