पार्थ पवारांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत संजोग वाघेरेंचा राजीनामा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांचा पराभव होताच नैतिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे या जागेसाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्क्याने पार्थ यांचा पराभव केला.
पार्थ यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. काम करुनही मिळालेले अपयश धक्कादायक आहे. इतक्या फरकाने पराभव होईल, असे वाटले नव्हते. आजचा निकाल आश्चर्यकारक आहे. इव्हीएम बाबत गडबड असल्याची प्रतिक्रिया संजोग वाघेरे यांनी दिली आहे.