पात्र लाभार्थ्यांच्या उशिरा आलेल्या जीएसटी पावत्या स्विकाराव्यात- संतोष कांबळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/2ramesh_more.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज )- पात्र लाभार्थ्यांच्या उशिरा आलेल्या जीएसटी पावत्या स्विकाराव्यात अशी मागणी नगरसेवक संतोष कांबळे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडुन सर्वसामान्यांसाठीच्या विविध योजना राबविण्यात येतात. सध्या नागरवस्ती विभागाकडुन सायकल, शिलाई मशीन आदी योजनांसाठी पात्र लाभार्थी कागदपत्रांच्या त्रुटीत अपात्र लाभार्थी यांची वस्तु खरेदीच्या जीएसटी पावत्या नागरवस्ती विभागाकडे जमा करण्यासाठी गर्दी आहे.
शिलाई मशीन खरेदीच्या जिएसटी पावत्या पहिल्या टप्प्यात जमा करण्यासाठी प्रशासनाकडुन 31 जुलै पर्यंत जमा करण्याबाबतची माहिती लाभार्थ्यांना फोनवर मॅसेजद्वारे कळविण्यात आली होती. त्यानंतर यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र पहिल्या टप्प्यातील अनेकजणांना हा मँसेज उशीरा प्राप्त झाला.काहींनी हा मॅसेज पाहिला नाही. तर काहींनी चुकीचा फोन क्रं. अर्जात नमुद केल्याने अनेक शिलाई मशीन लाभार्थी पात्र असुनही उशीरा जीएसटीच्या पावत्या सादर करण्यासाठी पालिकेकडे खेटे घालत आहे. अनेकांना पावत्या जमा करण्याची मुदत संपल्याने पालिका प्रशासनाकडुन उभारण्यात आलेल्या माहिती कक्षाकडुन परत पाठवण्यात आले.
बऱ्याच लाभार्थ्यांना मॅसेज उशीरा मिळाला किंवा कुणी पाहिला नाही फोनमधुन नजरचुकीने डिलिट झाल्यामुळे केवळ प्रशासनाकडुन दिलेल्या तारखेत जिएसटी पावती सादर करू न शकल्याने लाभार्थी नागरीक वंचित राहु शकतात. असे होवु नये यासाठी उशीरा आलेल्या शिलाई मशीन व ईतर पावत्या प्रशासनाकडुन सरसकट जमा करून घ्याव्यात व छाननी नंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळावे याची प्रशासनाने काळजी घ्यावी. याबाबत नागरवस्ती विभागाकडे नगरसेवक संतोष कांबळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.