पाणी टंचाईच्या विरोधात पिंपरी युवासेना आक्रमक, पालिकेवर हांडा मोर्चा काढणार !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/IMG-20191116-WA0010.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पवना धरणात मुबलक पाणीसाठा असताना दापोडीच्या काही भागांमध्ये विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने पिंपरीती युवासेने आक्रमक झाली आहे. प्रशासनाच्या अशा गलथान कारभाराचा पिंपरी युवासेनेने पाणी पुरवठा विभागाला मोकळा माठ देऊन निषेध नोंदविला आहे. येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत नाही केल्यास महापालिकेवर हांडामोर्चा काढून रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पवना धरण 100 % भरलं असून दापोडी व फुगेवाडीमधील नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. सारखेच दुरुस्तीचे काम सांगून पाणीपुरवठा अधिकारी नागरिकांची दिशाभूल करत आहे. येत्या 3 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाल्यास शिवसेना शाखा दापोडी, फुगेवाडी व युवासेना पिंपरी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमानाने महापालिकेवर हंडामोर्चा काढून रस्तारोको केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले, उपशहरप्रमुख तुषार नवले, विभागसंघटक निलेश हाके, विभागप्रमुख राजू सोलापुरे, शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, मनोज काची, शैलेश हाके, चिंचपा निंगडोळे, सुनील साठे, अमित काटे, बिरपा चटाळे, सुनील कदम आदी उपस्थित होते.