breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची उकल, 17.50 लाखांचा माल मूळ मालकांच्या स्वाधीन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यातील चोरीचा साडेसतरा लाखांचा मुद्देमाल पकडून तो मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या हस्ते हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.

पोलीस रेजिंग डे निमित्त निगडी पोलीस ठाण्यात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड परिसरातून चोरीला गेलेल्या 56 सायकल निगडी पोलिसांनी पकडल्या आहेत. त्यातील 22 सायकलच्या मूळ मालकांचा शोध लागला असून त्यांना सायकल परत करण्यात आल्या. तसेच, एक मोटारसायकल आणि सात मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 73 हजार 989 रुपयांचा ऐवज देण्यात आला.

आळंदी पोलिसांनी तीन मोटारसायकल आणि तीन घरफोड्यांमधील एकूण 9 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल परत केला. भोसरी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीच्या चार गुन्ह्यातील 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल मूळ मालकांना देण्यात आल्या.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन मोटारसायकल, एक मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने असा 73 हजार रुपयांचा ऐवज मूळ मालकांना दिला. पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील 45 हजारांचा ऐवज मूळ मालकांना परत देण्यात आला. अशा एकूण पाच पोलीस ठाण्यातील 17 लाख 47 हजार 789 रुपयांचा ऐवज मूळ मालकांना देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button