breaking-newsपिंपरी / चिंचवड

पशु पक्षांच्या काळजीपोटी घेतली गरुडझेप

  • काळेवाडीत राबविला अनोखा उपक्रम
  • झाडांवर केली पक्षांना पाण्याची सोय

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गरुडझेप फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि ज्येष्ठ सामाजसेवक मारुतीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पशु पक्ष्यांना पिण्यासाठी वृक्षांच्या फांद्यांवर भांडी बांधून त्यात पाणी ठेवण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिर याठिकाणी राबविण्यात आला. तसेच, पुण्यात देखील ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी कार्यरत आहेत. या अनोख्या उपक्रमाचे काळेवाडीत कौतुक केले जात आहे. यावेळी सीमा गरूड, समाजसेवक आनंद हुकीरे, संतोष कदम, तसेच उस्मानाबादचे समाजसेवक सतीश लोंढे आणि गरुडझेप फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

पशु पक्ष्यांची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात जागोजागी पशु पक्ष्यांना चारा व पाणी आपआपल्या परीने उपलब्ध करून दिली पाहिजे. पाणी पुरवठा कमी असल्यामुळे पशु पक्षांना पाणी व चा-यासाठी भटकंती करावी लागत आहे. ती सोय आपण केली पाहिजे, असे गणेश गरूड यावेळी म्हणाले.

मारुतीराव कदम मानले की, गरुडझेप फाऊंडेशनने आगळ्या वेगळ्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केला. ते पाहून मला आनंद झाला आहे. गरुडझेपचे खूपच सुंदर कार्य आहे. या कार्यात आमचाही सक्रिय सहभाग असणार आहे.

संजय कदम यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button