Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पवसाचा अंदाज घेऊन तीन दिवसानंतर कपात वाढीचा फेरविचार करू – आयुक्त श्रावण हार्डीकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Shravan-Hardikar-PCMC-New-Commissnor-04-1.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात केवळ 40 दिवस पुरेल अवढाच साठा शिल्लक आहे. येत्या तीन दिवसांत पावसाचा अंदाज घेऊन कपात वाढविण्याबाबत फेरविचार केला जाईल, असे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सूचित केले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
मावळातील पवना धरणात आजमितीला 13.38 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अद्याप म्हणावा एवढा पाऊस झालेला नाही. उपलब्ध 13 टक्के पाणी 40 दिवसच उपयोगात येणार आहे. दोन ते तीन दिवसानंतर पावसाचा अंदाज घेऊन कपात वाढीबाबत निर्णय घेतला जाईल. पावसाने दडी मारल्यास कपात वाढवावी लागेल, असे हार्डीकर यांनी सांगितले. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.