breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना नदीपात्रालगतच्या पुरग्रस्तांचे चुकीचे सर्व्हेक्षण, आर्थिक निधीत अफरातफर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील पवना नदीपात्रालगतच्या बाधीत व विनाबाधीत पुरग्रस्तांचा आकुर्डी तहसील कार्यालयाकडून चुकीचा सर्व्हे करण्यात आला असून संबंधित सर्व्हेक्षण करणा-या अधिकारी, कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते अजय लोंढे यांनी केली आहे.

आकुर्डी तहसील कार्यालयाकडून पवना नदीपात्रालगत दोन्ही बाजुवर राहत असलेल्या बाधित, विनाबाधित रहिवाशांचा सर्वे करण्यात आला. मात्र, हा सर्वे चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचा आरोप अजय लोंढे यांनी केला आहे. चुकीच्या पध्दतीने सर्वे करून शासकीय आर्थिक मदत निधीचा अपहार केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार लोंढे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आकुर्डी तहसिल कार्यालयांतर्गत पुरग्रस्त यादीत 2019 मध्ये जाणिवपूर्वक शासकीय निधीची लुट झाली आहे. आर्थिक लूट करण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण अहवालात चुकीच्या रहिवाशांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. चुकीची माहिती व पुरावे दाखवून खरे लाभार्थी वगळण्याचा पराक्रम केला आहे. सर्व माहती व पुराव्यांची शहानिशा करून दोषी अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी लोंढे यांनी तक्रारीत केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button