breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरण 98 टक्के भरले; १२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

  • नदीकाठ गावाना सर्तकतेचा इशारा

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. आज (शनिवार, दि. ३) सकाळी सहापासून पवना धरणाच्या जल विद्युत केंद्रातून १२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार धरणसाठ्यात घसघशीत वाढ होऊन धरणात 97.87 जलसाठा आहे.

गेल्या चोवीस तासात ११५ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जून ते आज अखेर एकुण २१३३ पाऊस झाला आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पवनाधरण शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी सांगितले आहे.पवनाधरणातून शनिवारी १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार

पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी सकाळी पवनाधरणातून १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना धरण परिसरातून पाणी पुरवठा होतो. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. जलाशयात होणारी वाढ आणि धरण परिसरातही पाऊस यामुळे धरणातून विसर्ग सोडावे लागणार आहे. शनिवारी सकाळी पवनाधरणातून १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येणार आहे.  महापालिका आपत्कालीन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button