‘पवनाथडी’ जत्रेला पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/3-8.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पवनाथडी जत्रेला उत्साहात सुरु आहे. पहिल्या दिवसापासूनच पवनाथडीला नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत असून यंदाच्या जत्रेमध्ये प्रवेशद्वारापासूनच
वैविध्यपूर्ण सजावट पाहायला मिळत आहे.
नवी सांगवी येथील पवनाथडी जत्रेला आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडीगेरी, नगरसदस्या शारदा सोनवणे, आरती चौंधे, सिमा चौघुले, स्वीकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे यांनी भेटी देवून सर्व स्टाॅल्सची माहिती जाणून घेतली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/42de963a-d7f3-4e57-a522-71da17477365.jpg)
जत्रेत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला ‘मामाचे गाव’ साकारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश केल्यापासूनच जत्रेचा माहौल पाहायला मिळाला. एका बाजूला चौघडावादन, वाघ्यामुरळी, गोंधळी यामुळे ग्रामीण भागाचा अनुभव येतो. शहरात राहणा-या मुलांना ग्रामीण भागातील गावाचा अनुभव देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. यामध्ये वाडा, बैलगाडी, बांबूपासून केलेली झोपडी, विहीर, हातमाग, विणकाम साकारण्यात आली आहे. शहरातील उल्लेखनीय असलेल्या महापालिका इमारत, भक्ती शक्ती शिल्प, एच.ए. कंपनी यांची प्रतिकृती आहे. त्यावर रोषणाई करण्यात आली आहे.
एकंदरीत लक्षवेधी असलेली सजावट यामुळे दरवेळी पेक्षा यंदाची पवनाथडी विशेष असल्याचे जाणवते आहे. केवळ खरेदीविक्री आणि स्टॉल या पुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पवनाथडीत पाहायला मिळते आहे. महिलांना तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न पवनाथडीतून करणार असल्याचे महापौर माई ढोरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे दररोज सायंकाळी वेगवेगळ्या स्थानिक आणि इतर संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची संधी महापालिकेने दिली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/DSC_6099-1024x662.jpg)
पवनाथडीच्या दुस-या दिवशी थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने ‘ऐतिहासिक स्त्री पर्व’ कार्यक्रम सादर झाला. पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील स्त्रियांपासून ते आजच्या स्त्रियांना करावा लागणारा संघर्ष यातून दाखवण्यात आला. सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात कार्यरत असल्या तरिही त्यांच्याबाबतीत होणा-या अघटीत प्रकार थांबणार कधी असा सवाल यातून उपस्थित करण्यात आला. त्यानंतर लक्ष्मणरेषा या सदाबहार कार्यक्रमातून भक्तीगीते भावगीते व देश भक्तीपर गीतांचे
सादरीकरण झाले यामध्ये झी मराठी फेम सन्मिता धापटे, आंतरराष्ट्रीय किर्तीची गायिका रूपाली घोगरे, मिनल देशमुख गणेश मोरे व महाराष्ट्राचा ख्यातनाम मिमिक्रीकार (विनोदवीर) योगेश सुपेकर यांचा सहभाग होता.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे या पवनाथडी जत्रेच्या
मुख्य उद्दिष्टाने दि. ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२० अखेर विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी माहिलांच्या पौराणिक काळापासून सध्याच्या वर्तमान काळापर्यंत महिलांनी केलेला संघर्ष नाट्य अविष्कारातून मांडताना राजमाता जिजाऊं पासून संत मदर तेरेसां पर्यंतचा प्रवास व त्यांनी केलेला संघर्षाचे सादरीकरण संहिता लेखक प्रभाकर पवार, दिग्दर्शिका अमृता ओंबळे – पवार व लक्ष्मी घाटपांडे यांचे स्त्रीपर्व या ऐतिहासिक या नाट्य अविष्कारातून दाखविण्यात आले.
दरम्यान स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नितीन वाघ लिखित
व दिग्दर्शित स्वच्छतेचा संदेश देणारे मुक नाट्य शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनींनी सादर केले. या
मुकनाट्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.