breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवनाथडी जत्रेत भरगच्च सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून बनविलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हक्काची बाजारपेठ म्हणून 4 ते 8 जानेवारी दरम्यान पवनाथडी जत्रा भरविण्यात येत आहे. जत्रेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 4) सकाळी अकरा वाजता होणार असून पाच दिवस विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर होणार आहेत, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे पवनाथडी जत्रेचे नियोजन केले आहे. जत्रेतील 820 गाळ्यांचे शहरातील बचत गटांना वाटप केले आहे. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर, प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून सायंकाळी म्युजिक मेलेडी हिंदी मराठी नृत्यगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच, सायंकाळी सात वाजता “गर्जा हा महाराष्ट्र” हा कार्यक्रम सादर होणार आहे. शनिवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा, सात वाजता “लावण्य दरबार” हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. ६) सायंकाळी पाच वाजता लिटील चॅम्स, सात वाजता सारेगमप कलाकार व “बॉलीवूड स्टार्स”, हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल सादर होणार आहे. सोमवारी (दि. ०७) सायंकाळी पाच वाजता धडाकेबाज सखी हा महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम व सात वाजता गायन, वादन व नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम (I Love My India) तर सायंकाळी सात वाजता कलाअविष्कार, मराठी चित्रपट गीते, भावगीते ह्या कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता होणार आहे.

कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत महापौर राहूल जाधव, नगरसेविका आरती चोंधे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button