breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पदाधिका-याचा दाैरा अन्ं अधिका-याची चंगळ !

महापालिकेचे कामकाज थंड ; सर्वच विभागात आआे-जाआे घर तुम्हारा कारभार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असलेले महापालिकेचे महापाैर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, आयुक्त, नगरसेवक आणि काही अधिकारी स्पेनमधील बर्सिलोना अभ्यास दाै-यास सोमवारी (दि.12) रवाना झाले आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्वच विभागातील कामकाज थंडावले असून अधिकारी व कर्मचा-याचे आआे-जाआे घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध कामकाज अालेल्या शहरातील अनेक नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. 

स्पेनच्या बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेसच्या वतीने स्मार्ट सिटी एक्प्रो काँग्रेस 2018 या परिषदेचे 13 ते 15 नोव्हेंबर या कालावधी आयोजन केले होते. याकरिता महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेचे सचिन चिखले, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे, पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता राजन पाटील हे सहभागी झाले आहेत. या दौर्‍यासाठी 20 लाख 21 हजार 250 रुपये खर्च करण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेचे सत्ताधारी, विरोधी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, पालिका आयुक्त हे दाै-यावर गेल्याने महापालिकेचे दैनंदिन कामकाज संथ गतीने सुरु आहे. महापालिकेच्या अनेक विभागातील अधिकारी व कर्मचारी अजूनही दिवाळी सुट्टीतून बाहेर आलेले नाहीत. काहीजण सकाळी तासभर कार्यालयात थांबून खासगी कामासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. आयुक्त नसल्याने मागील चार दिवसापासून महापालिकेत शुकशुकाट पसरला आहे.  त्यामुळे अधिकारी व कर्मचा-यांची चांगली चंगळ सुरु आहे. तसेच पुढील आठवड्यातही रविवारसह तब्बल पाच सुट्टया लागून आल्याने अनेकांनी विविध सहलीचे आयोजन केल्याचेही बोलले जात आहे.

शिक्षण प्रशासन अधिका-यांची धावपळ सुरु

महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे या प्रतिनियुक्तीवर आलेल्या आहेत. त्या शिक्षण विभागात पदभार स्विकारल्यापासून वादग्रस्त ठरु लागल्या आहेत. कार्यालयात सतत गैरहजर राहणे, पदाधिका-यांची वेळेवर पत्राला उत्तरे न देणे, त्याचे फोन न स्विकारणे, यासह अनेक कारणांमुळे त्यांच्या कारभारावर महापाैर राहूल जाधव यांच्यासह अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यांना पुन्हा राज्यसेवेत परत पाठविण्याचा ठराव महासभेत सत्ताधारी भाजपने केला आहे. त्यामुळे मागील चार ते पाच दिवसापासून शिक्षण प्रशासन अधिका-यांची धावपळ सुरु झाली असून अनेक स्थानिक भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेवू लागल्या आहेत. त्यांच्या गाठीभेटीमुळे त्या शिक्षण विभागातील कार्यालयात वारंवार गैरहजर राहू लागल्याने त्यांना भेटण्यास आलेल्या अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button