breaking-newsपिंपरी / चिंचवड

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सांगवी येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात महापौर उषा ढोरे, महिला व बालविकास सभापती निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, मॅनेजर हेन्केल फर्मा. लिमिटेड डॉ. प्रसाद खंडागळे, डॉ. वसंत चाबुकस्वार यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, पोलीस निरीक्षक विवेक कुमुटकर, अध्यक्ष समस्त गावकरी मंडळ रहाटणी देवाप्पा नखाते, भगवान गोडांबे, देविदास तांबे, राजेश भालेराव, संदीप चाबुकस्वार, राकेश भास्कर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी महाराष्ट्राची लोकधारा, सांस्कृतिक नृत्य, कोळी नृत्य, देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, पर्यावरणाला होणारे नुकसान, स्त्री भ्रूण हत्या या विषयांवर आधारित उत्कृष्ट नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व स्वागतगीत सर्व शिक्षकांनी केले. वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

सूत्रसंचालन रेणू राठे, उत्कर्षा पाटील, रंजिता महातो व अनुराग यादव या शिक्षकांनी केले. आभार प्रदर्शन निशा पवार यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button