breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नेहरुनगर वाहनांची तोडफोड व मारहाण प्रकरणी एकाला अटक

 पिंपरीतील नेहरूनगरमधील विठ्ठलनगर परिसरात 10-12 जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र घेऊन मंगळवारी (दि.15) रात्री धुडगूस घातला. रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहने फोडत दोन जणांवर वार देखील केले होते. या प्रकरणी एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश रामदास नेहरकर (वय 39, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिनेश भारत गायकवाड (वय 25, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच रिंकु उर्फ करण पिटेकर (वय 20 रा. बालाजीनगर, पिंपरी), नारायण शिंदे (रा. बालाजीनगर, पिंपरी) यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास 10-12 जणांच्या टोळक्याने विठ्ठलनगर परिसरात वाहनांची तोडफोड केली. दरम्यान नेहरकर कामावरून घरी जात होते. टोळक्याने नेहरकर यांना अडवून बेदम मारहाण केली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच संभाजी भगवान म्हस्के (वय 36) यांना  मारहाण केली होती. दुचाकी, रिक्षा आणि कार अशा एकूण 10-12 वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विठ्ठलनगर परिसरासह संतोषी माता चौक, क्रांती चौक या भागातही टोळक्याने धुडगूस घातला. धुडगूस घालणा-या टोळीतील एकाला अटक करण्यात आली असून त्याचे अन्य साथीदार फरार आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button