breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निविदा न राबविता ठेकेदाराला घातल्या ‘पायघड्या’, सुमारे 21 कोटी अखिल भारतीयच्या ‘घशात’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत ”पंडीत दिनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम” योजनेंतर्गत महिलांना विविध व्यावसायीक प्रशिक्षण देण्यासाठी चॅम्प संस्थेची नेमणूक केली होती. त्यातच स्थायीच्या चाव्या हाती येताच नवीन सभापतींनी याबाबतचा ठराव रद्द करून जुन्याच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची या कामासाठी नेमणूक करण्याचा ठराव मंजूर केला आहे. माजी सभापती विलास मडिगेरी यांनी नेमलेल्या संस्थेचे काम काढून अखिल भारतीय संस्थेला देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील महिलांमध्ये स्वयंरोजगार निर्मितीची स्फुर्ती वाढविण्यासाठी महापालिकेच्या कल्याणकारी योजना निश्चितच उपयुक्त ठरत आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमअंतर्गत महिलांना वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी महिला व बालकल्याण योजनेंतर्गत 21 प्रकारचे व्यावसायीक प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण देण्यासाठी माजी सभापती विलास मडिगेरी यांनी सदस्यपारित ठराव मंजूर करून चॅम्प नावाच्या संस्थेची नेमणूक केली होती. ही संस्था राजकीय नेत्याशी निगडीत असल्यामुळे देण्या-घेण्याच्या गोष्टीला प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातच स्थायी समितीचे सभापती मडिगेरी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी आमदार महेश लांडगे यांच्या गटातील संतोष लोंढे यांनी बस्तान मांडले आहे.

सभापती लोंढे यांनी मडिगेरींनी मंजूर केलेला ठराव रद्द करून चॅम्प संस्थेचे काम काढून घेतले आहे. हे काम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्याचा ठराव आज सभेत मांडण्यात आला. त्याला लोंढे यांनी मान्यता दिली. अखिल भारतीय संस्थेने यापूर्वी हे काम केले आहे. आता हे काम देताना निविदा राबविण्यात आली नाही. जुन्याच अटीशर्तींना समोर ठेवून हे काम करण्याचे आदेश अखिल भारतीय संस्थेला देण्यात येत आहेत. महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमाच्या नावाखाली 21 कोटी रुपये खर्चाचे काम या संस्थेला देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button