breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निमंत्रण पत्रिकेसह स्मृतीचिन्ह यापुढे बंद ; स्थायी समितीचा निर्णय

पिंपरी – राज्य व केंद्रीय मंत्र्याचे कार्यक्रम वगळता अन्य कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका न छापण्यासह स्मृतिचिन्ह भेटवस्तु म्हणून न देण्याचा निर्णय स्थायी समिती आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत घेतला. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये रुग्णाचा वाढता व्याप विचारात घेता व सध्या आवश्यक असलेले विविध कन्सलटंट पदे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात सहा महिने करिता भरण्यासाठी मान्यता देण्यात आली. अ प्रभागातर्गत उंच पाण्याच्या टाक्यावरुन पाणीपुरवठा व्यवस्थापन करण्यासाठीच्या 10 लाख 58 हजार 405 रुपये वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सहकारिता मंत्रालयाच्या सहयोगाने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विदयमाने शहरातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार असून त्यासाठी येणा-या सुमारे चार लाख 50 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. मे.आयडीया कंपनीमार्फत वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, अभियंते व विविध कार्यालये यांना 3G/4G डोंगल सुविधा पुरविण्याचे कामासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास व येणा-या सुमारे सहा लाख 45 हजार रुपये पर्यंत खर्चास मान्यता देण्यात आली.पालिकेच्या सन 2018-19 च्या अंदाजपत्रकातील ब क्षेत्रिय कार्यालय स्थापत्य विभागाच्या कामासांठी तरतूद उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

पिंपरी भाजी मंडई येथील इमारतीमधील जुने रात्र निवारा केंद्र वाढविणे व देखभाल दुरुस्ती करणे या कामासाठी वास्तुविशारद नेमणेस मान्यता देणेत आली. कृष्णानगर संप व पंप हाऊस व इतर ठिकठिकाणी व्हॉल्व ऑपरेशन करिता मजुर कर्मचारी पुरविणे साठीचे सुधारित वाढीव सुमारे सहा लाख 58 हजार 796 रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button