breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीतील भक्ती-शक्ती उड्डाणपूलाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

  • अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांच्या मागणीनंतर भेट

पिंपरी | महाईन्यूज

निगडीतील भक्ती-शक्ती रोटरी उड्डाणपुल कामाबाबत काही तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी अ प्रभागाच्या अध्यक्षा व नगरसेविका शर्मिला राजेंद्र बाबर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच भक्ती-शक्ती उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली. कंत्राटदाराला जलद गतीने काम करण्याच्या सूचना देत वाहतूक सुरळित करण्यासाठी मुंबईकडे जाणारा पुल खुला करण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

मुंबईहून पुण्याकडे येताना पिंपरी-चिंचवडचे प्रवेशव्दार म्हणून निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकाची ओळख आहे. येथील वाहतूक कोंडीपासून  सुटका करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रोटरी उड्डाणपुल हाती घेतला. या कामासाठी नेमलेल्या संबधित ठेकेदारी कंपनीकडून संथ गतीने भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. संथ गतीमुळे चौकातील वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा पाहणी दौरा केला. यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक उत्तम केंदळे, बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता विजय भोजने  यांच्यासह ठेकेदारी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

पुणे, मुंबईकडे जाणा-या वाहनचालकांना, तसेच स्थानिक नागरिकांना लांबचा वळसा घालून जावे लागते. त्यासाठी जवळपास काम पूर्ण झालेला  पुण्याकडून मुंबईकडे जाणारा पूल तातडीने सुरू करण्याची मागणी शर्मिला बाबर यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी केली. या संदर्भात आयुक्त हर्डीकर यांनी शहरातील वाहतुकीच्या सोयीसाठी या उड्डाणपूलाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना कंत्राटदार, तसेच संबधित अधिका-यांना दिल्या आहेत. त्यासह सद्यस्थितीत वाहनचालकांची अडथळे दूर करण्यासाठी उर्वरित कामे पूर्ण करून मुंबईकडे जाणारी पुलाची बाजू तातडीने सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button