Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
नादुरूस्त वॉल्वमुळे हजारो लिटर पाणी वाया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/IMG-20180904-WA0017.jpg)
पिंपरी – प्रभाग क्रमांक 27, रहाटणी-काळेवाडी भागातील जय भवानी चौकात पाण्याचा वॉल्व नादुरूस्त असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे. वॉल्व दुरूस्त करून पाण्याची नासाडी थांबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना संपर्क प्रमुख युवराज दाखले यांनी केले आहे.
यासंदर्भात दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रहाटणी-काळेवाडी भागातील जय भवानी चौकात पाण्याचा वॉल्व नादुरूस्त अवस्थेत आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून याकडे लक्ष देऊन वॉल्वमधील दुरूस्ती करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत, अशी विनंती दाखले यांनी केली आहे.