‘नागरिकांनो पाणी उकळून प्या’, सहशहर अभियंता रामदास तांबे यांचे आवाहन
![पिंपरी चिंचवडमध्ये आज 128 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-6.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या बहुतेक भागांमधून दुषीत पाण्यामुळे उलट्या, जुलाब व पोटदुखीचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त होत आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागातील पाण्याचे नमुने तपासले असता पाणी दुषीत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या पावसाळा असून नागरिकांनी नळाचे पाणी उकळून ते थंड करून पिण्यास वापरावे, असे आवाहन पाणी पुरविठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.
सध्या पावसाळा असून शहरात दुषीत पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे उलट्या, जुलाब व पोटदुखीचे रुग्ण वाढत असल्याची माहिती मिळत आहे. वास्तवीक पाहता तशी परिस्थिती नसून पालिकेचे पाणी कोणत्याही भागात दुषीत पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले नाही. वितरण व्यवस्थेतील पाण्याची तपासणी केली असता त्यात सर्व ठिकाणी क्लोरीन आढळून आले आहे.
पाण्यात सुरक्षित प्रमाणात क्लोरीन असणे, हि ‘पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याची’ खूण आहे.
पाण्यात कोणतेही अपायकारक जिवाणू, विषाणू नाहीत. याची खातरजमा करण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन अणु जीव चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातही, वितरण व्यवस्थेतील पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच, महानगरपालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी, सुरक्षित व पिण्यायोग्य असलेबाबत बाहेरील प्रयोगशाळेतूनही खातरजमा करण्यात आली आहे.
महानगरपालिका वितरित करीत असलेले पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असलेने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. उलट्या, जुलाब व पोटदुखीचे कारण विषाणूजन्य (Viral) अथवा अन्य कारणेही असू शकतात. त्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष कारण शोधण्यासाठी उलट्या, जुलाब, पोटदुखी असणाऱ्या आजारी व्यक्तींच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात येतील.
या सर्व पार्श्वभूमीवर, सर्व पिंपरी चिंचवडवासियांना पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभाग सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी पुढील आवाहन केले आहे.
१) पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे.
२) ताजे अन्न पदार्थ खावेत. शिळे अन्न खाऊ नये.
३) अन्न पदार्थ झाकून ठेवावेत.
४) उघड्यावरील तसेच
बाहेरील अन्न पदार्थ खाऊ
नयेत.
५) फळभाज्या, पालेभाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून, व्यवस्थित शिजवून खाव्यात.
६) जेवणापूर्वी तसेच शौचाहून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
७) घर व परिसर स्वच्छ ठेवावे,जेणेकरून माश्या होणार नाहीत.
८) जमिनीवरील पाण्याची टाकी तसेच इमारतीवरील पाण्याची टाकी स्वच्छ असलेबाबत खातरजमा करून त्यावर झाकण व्यवस्थित असल्याची खात्री करावी.
९) आपल्याला गढूळ पाणी येत असेल तसेच कोठेही पाण्याची गळती दृष्टिपथास आल्यास त्वरित सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666 वर कळवावे.
१०) कोरोना – कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासन तसेच महानगरपालिकेच्या निर्देशांचे पालन करावे.
११) कोरोनाशी लढण्यासाठी तोंडाला व नाकाला मास्क लावण्यात सर्वांचेच हित आहे.