breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नववर्षाच्या स्वागताला ‘दारु सोडा अन्ं दुध प्या’; मानवी हक्क संरक्षण समितीचा उपक्रम

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  नववर्षाच्या स्वागताला ‘दारु सोडा अन्ं दुध प्या’ अशी साद घालत पिंपळे गुरवमध्ये मानवी हक्क संरक्षण व जागृती नागरिक आणि युवकांमध्ये जनजागृती करण्यात आली.  
मानवी हक्क संरक्षण व जागृती समितीच्या वतीने पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यान व फेमस चौकात नागरिकांना दूध वाटप करण्यात आले. यावेळी सध्याची तरुणाई व्यसनाधिन होत चालली आहे. अनेकांचे संसारही उध्दवस्त होवू लागली आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सूरुवात दूध पिऊन करा, अशी जनजागृती करण्यात आली.
देशात अल्कोहोल  पिणाऱ्यांचे प्रमाण 39,% आहे. भारतात 36% तर महाराष्ट्रात 41% आहे.  त्यापैकी दररोज पिणाऱ्यांचे प्रमाण 30% आहे. कधीतरी पिणाऱ्यांचे प्रमाण 11% आहे, अशी भयानक परिस्थिती आपल्या देशाची आहे. त्यामुळे आपण गतवर्षीचा शेवट व नविन वर्षाची सूरूवात दारू पिऊन न करता दुध पिऊ करा. तसेच अल्कोहोल मुक्त जिवन जगा, असे आवाहन शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केले.
यावेळी पूणे यूवक अध्यक्ष धनरासिंग चौधरी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, महाराष्ट्र संघटक सचिव राजश्री गागरे,  पिंपरी चिंचवड संघटक सचिव गजानन धाराशीवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, उद्योजक विजुशेठ जगताप, उपाध्यक्ष विकास शहाणे, युवक उपाध्यक्ष नियाज शेख, पिंपरी चिंचवड महिला उपाध्यक्षा नूतन शेळके, पिंपरी चिंचवड,पब्लिसिटी आँफीसर पंडित वनस्कर, संपदा ईतापे, हनूमंत पंडीत, अँड सचिन काळे, आरोग्य अधिकारी संजय मानमोडे, विनोद कांबळे, कृष्णा कदम शिवानंद तालीकोटी ,सूदाम जोगदंड, नितीन जोगदंड, प्रदिप गायकवाड, अरविंद मांगले, वसंतराव चकटे, शुभांगी जोशी, गोरखनाथ वाघमारे, प्रा ढेरे सर, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र संचालक प्रदिप बोरसे, सूरेश पवार उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button