नववर्षाच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडमध्ये 68 बालके जन्मली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-2.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
नवीन वर्षाच्या मूहर्तावर शहरामध्ये 68 बालकांचा जन्म झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बाळ जन्माला यावे असा अनेक आई-वडिलांचा हट्ट असतो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 जानेवारी 2020 या दिवशी 68 बालकांचा जन्म झाल्याची नोंद आहे.
वर्षाच्या पहिल्या दिवशी बाळाचा जन्म शुभ मानला जातो. 2020 या वर्षीच्या पहिल्या दिवशी 38 मुलींचा जन्म झाला आहे. तर 52 मुलांचा जन्म झाला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये या दिवशी 15 बालकांचा जन्म झाला. भोसरी रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या दवाखान्यांमध्ये 13, आकुर्डी 12, प्राधिकरण 2 व थेरगाव रुग्णालयाअंतर्गत 7 बालकांचा जन्म झाला. तसेच तालेरा रुग्णालयामध्ये 10, जिजामाता रुग्णालयात 1 व पिंपरी वाघेरे दवाखान्यात 4 बालकांचा जन्म झाला. सांगवी येथील रुग्णालयात 4 असे संपूर्ण शहरामध्ये 68 बालकांचा जन्म झाला.
विशेष म्हणजे यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत मुलींच्या वाढत्या जन्मदराने शहरात झाले आहे ही बाब स्वागतार्ह आहे. 1 जानेवारी 2020 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या बालकांच्या संख्येमध्ये भारत हा एक क्रमांकावर आहे. भारतामध्ये या दिवशी तब्बल 67 हजार 385 बालकांचा जन्म झाला आहे.