breaking-newsपिंपरी / चिंचवड

नगरसेविका मनिषा पवार यांनी माणुसकीचे दर्शन घडवले!

महापौर माई ढोरे : ‘अन्नछत्र’उपक्रमाचे केले कौतूक

पिंपरी । प्रतिनिधी

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात नगरसेविका मनिषा पवार यांनी सलग ६० दिवस गरजु नागरिकांना मोफत जेवण उपलब्ध करुन दिले. संकटाच्या काळात पवार यांनी माणुसकीचे दर्शन घडवले, अशा भावना पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केल्या.

          नगरसेविका मनिषा पवार यांनी सुरू केलेल्या अन्नछत्र उपक्रमाचा समारोप महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांच्याहस्ते जेवण वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लॉकडाउन करण्यात आले. उद्योग आणि व्यावसाय बंद असल्यामुळे कष्टकरी, रोजंदारीवर कामगारांना रोजगार ठप्प झाला. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची उपासमार होवू नये. याकरिता आम्ही अन्नछत्र सुरू केले. त्याद्वारे गेल्या ६० दिवसांपासून आम्ही दोनवेळचे जेवण गरजू नागरिकांना उपलब्ध करुन देत आहोत. विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात कोणतीही भीती न बाळगता. फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करुन आम्ही हा उपक्रम राबवला. या उपक्रमासाठी प्रभागातील अनेक महिलांनी मदत केली. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांचाही आम्ही सत्कार केला, असे नगरसेविका मनिषा पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button