breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवकांना विश्वासात घेवून अधिका-यांनी कामे करावेत – महापाैर राहूल जाधव

  • महापालिकेत ब प्रभागाच्या अडीअडचणीवर घेतली बैठक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविकेच्या येणा-या सुचना अधिका-यांनी विचारात घ्याव्यात, कोणतंही विकास काम करताना अधिका-यांनी नगरसेवकांना विश्वासात घेतल्याशिवाय करु नये, अशा सक्त ताकीद महापाैर राहूल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयातंर्गत अडीअडचणी, विकास कामांबाबत आढावा महापाैरांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, नगरसेविका माधुरी ऊर्फ मोनाताई कुलकर्णी, नगरसदस्य बाळासाहेब
ओव्हाळ, नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसदस्या प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, अश्विनी चिंचवडे, निता पाडाळे, उषा काळे, स्वीकृत सदस्य अँड. मोरेश्वर शेडगे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, कार्यकारी अभियंता एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरावाहतूक गाडया वाढविण्यात येणे, यावर चर्चा झाली. विसर्जन घाटावरील कामकाज पुर्ण करणे, स्मशानभूमी, स्मशानघाटाचे कामकाज पुर्ण करणे, मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, पाणीपुरवठा सुरळीत होणे, रस्त्यावरील खड्यांची डागडुजी करणे, प्रभागातील अतिक्रमणे त्वरित काढणे, भाजीमंडई स्वच्छ ठेवणे प्रभागातील बीआरटीएस वाहतुक ताबडतोब
चालू करणे, चाफेकर पुतळयासमोरील पूलाखालील अतिक्रमण त्वरित हटवणे, काळेवाडी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणेबाबत सूचना केल्या. यासह विविध विकास कामांवर चर्चा झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button