‘नगरसेवकांना चोपून काढा’ म्हणणा-या अधिका-यावर गुन्हा दाखल करा
- महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
पिंपरी (महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर कर्मचारी महासंघाने उपअभियंता अनिल राऊत यांना मारहाण झाल्याने निषेध सभा घेतली. त्या सभेत महापालिकेतील एका अधिका-याने नगरसेवकांना चोपून काढा, असे वक्तव्य केले. त्या अधिका-यावर तात्काळ गु्न्हा दाखल करावा, अशी मागणी महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
यासंर्दभात पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, अपक्ष आणि काही भाजप नगरसेवकांनी निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य तथा शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि शिवीगाळ करुन मारहाण करणे याबाबत महापालिकेचे उपअभियंता अनिल राऊत यांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतू, सदरचा गुन्हा अदखल पात्र नोंदविला गेला आहे. तसेच अनिल राऊत यांच्या विरोधातही राहूल कलाटे यांचे कार्यकर्ते कामठे यांनी खंडणी मागितलेबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तो गुन्हा अदखलपात्र दाखल केला आहे. वस्तूत तो गुन्हा दखलपात्र गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.
दरम्यान, महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारात अनिल राऊत यांना मारहाण झाल्याबाबत निषेध सभा झाली. त्या सभेत महापालिकेच्या अधिका-यांनी नगरसेवकांना चोपून काढा असे वक्तव्य केले आहे. या अधिका-यावर तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच कामठे यांंनी अनिल राऊत यांच्या विरोदात दाखल केलेला गुन्हा दखलपात्र म्हणून नोंदविण्यात यावा,अशीही मागणी नगरसेवकांनी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक राजू मोरे, राजू बनसोडे, पोणिमा सोनवणे, मिनल यादव, रेखा दर्शिले, आश्विनी वाघमारे, मोरेश्वर भोंडवे, नवनाथ जगताप, शाम लांडे, रोहित काटे, शाम लांडे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, अमिल गावडे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.