breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवकांच्या दहशतीपुढे आयुक्तांची घबराट, चक्क पोलीस संरक्षणात झाली स्थायी समितीची बैठक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची काल रात्री उशिरापर्यंत चाललेली स्थायी समितीची बैठक चक्क दहशतीखाली पार पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरसेवकांची दमबाजी वाढल्याने स्थायी समितीच्या सभेसाठी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले. रोड स्वीपर मशीन खरेदीच्या विषयासह ऐनळचे विषय दाखल करून घेण्यासाठी दबाव वाढल्याने या भितीसदृष्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आयुक्तांनी पोलीस संरक्षण मागविल्याची माहिती मिळली आहे.

स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांची शेवटची सभा काल संपुष्टात आली. शेवटची सभा असल्याने वाढीव रकमेचच विषय ऐनवेळी दाखल करून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला होता. त्यातच, रोड स्वीपर मशिन खरेदी निविदेला काल अधिकृतरित्या मंजुरी देण्यात येणार होती. या विषयात टक्केवारीचे गणित न जुळल्यामुळे नाराज नगरसेवकांनी आयुक्तांसह सभापती, आमदार यांच्या विरोधात जाऊन दबाव वाढवला होता.

त्यामुळे सभापती मडिगेरी यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा दहशतीखाली पार पडली. काल सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेली ही सभा रात्री नऊ वाजता संपली. सभेत १३४ ऐनवेळच्या विषयांसह २६ विषयांतील तब्बल ३५० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. तसेच, सभेत ७०० कोटींच्या रोड स्वीपर मशिन खरेदीच्या विषयाला मंजुरी देण्यात येणार होती. या विषयात शहरातील राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना टक्केवारीची विभागणी करून दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आयुक्तांचा सहभाग असल्याने नगरसेवकांनी त्यांना टार्गेट केले होते. टक्केवारीसाठी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर दबाव वाढवला होता.

म्हणून, कालच्या स्थायी समिती सभेसाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. पिंपरी पोलीस ठाण्याचे साध्या वेषातील सहा पोलिस कर्मचारी एक उपनिरीक्षक महापालिकेत सभा दालनाच्या बाहेर खडा पहारा देत होते. नगरसेवकांचा उपद्रव लक्षात आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी स्वतः फोन करून हा पोलीस बंदोबस्त मागविला होता. पोलीस बंदोबस्तात स्थायीची बैठक पार पडल्याची घटना इतिहासात प्रथमच घडली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button