breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने खडकवासला कळमोडी धरण ‘ओव्हरफ्लो’

पुणे –  खडकवासला साखळी प्रकल्पात मागील पंधरा दिवस पाऊस कोसळ्यानंतर शुक्रवारी धरण पाणलोट क्षेत्रात केवळ हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. दमदार पावसामुळे खडकवासला आणि कळमोडी ही दोन धरणे शंभर टक्के भरली आहेत. गुंजवणी आणि पानशेत धरणांतील पाणीसाठा निम्म्यापयर्र्ंत पोचला आहे.

खडकवासला साखळीतील प्रकल्पात असलेल्या पानशेत धरण क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत 3, टेमघर 15 आणि खडकवासला क्षेत्रात 1 मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत टेमघर 119, वरसगाव 49, पानशेत 41 आणि खडकवासला येथे 4 मिलिमीटर पाऊस झाला. टेमघर धरणात 0.82 (22.06 टक्के), पानशेत 5.23 (49.12 टक्के), वरसगाव 4.83 (37.66 टक्के) आणि खडकवासला धरणात 1.97 (100 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चारही धरणांतील पाणीसाठा 12.85 टीएमसी (44.08 टक्के) झाला आहे.

गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 49 आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत 3 मिलिमीटर पाऊस झाला. निरा देवघर क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. गुंजवणी धरणात 1.81 (49.20 टक्के), निरा देवघर 4.63 (39.51 टक्के), भाटघर धरणात 9.20 टीएमसी (39.37 टक्के) आणि वीर धरणात 5.83 (62 टक्के) पाणीसाठा झाला आहे. मुळशी धरण क्षेत्रात 64 मिलिमीटर पाऊस झाला असून, पाणीसाठा 7.46 टीएमसी (40.41 टक्के) झाला आहे. पवना धरण क्षेत्रात 58 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येथील पाणीसाठा 3.35 टीएमसी (39.41 टक्के) झाला. पिंंपळगाव जोगे धरणक्षेत्रात शुक्रवारी सकाळी आठपर्यंत 45, माणिकडोह 20, येडगाव 12, वडज 21, डिंभे 25, कळमोडी 57, चासकमान 26, भामा आसखेड 6, वडीवळे 52 आणि आंद्रा क्षेत्रात 2.27 मिलिमीटर पाऊस झाला.

पिंपळगाव जोगे धरणक्षेत्रात यंदा 352 मिलिमीटर पाऊस झाला असून, उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. माणिकडोह 1.35 (12.25 टक्के), वडज 0.46 (39.53 टक्के), डिंभे 3.60 (28.82 टक्के), चासकमान 2.95 (38.91 टक्के), भामा आसखेड 2.88 (37.62 टक्के), आंद्रा 2.27 (77.55 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button