breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक : 47 वर्षीय व्यक्तीने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – एका 47 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्तीवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 1) सायंकाळी पाचच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टीत घडला आहे.

अकबर मुनीर शेख (वय ४७, रा. जे ब्लॉक, ३६ समोर, बालाजीनगर झोपडपट्टीसमोर एमआयडीसी भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित १४ वर्षीय मुलीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अकबर पीडित मुलीच्या घरी गेला. दरवाजातून काय काम आहे? अशी विचारणा केली असता अकबरने अल्पवयीन मुलीची ओढणी ओढून तिचा विनयभंग केला. अकबर याला अद्याप अटक झालेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button