‘दोन मंत्र्याचे’ आदेश धुडकावत अजित पवारांची चिखलीतील अतिक्रमणावर धडक कारवाई
![Ajit Pawar cracks down on mud encroachment, defying orders of 'two ministers'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/IMG-20210203-WA0008.jpg)
- एक लाख 50 हजार स्वेअर फुट पत्राशेड होणार कारवाई
- दोन पोकलेन व क्रेन, सात जेसीबी, शेकडो पोलिस, अधिकारी, कर्मचा-यांचा फाैजफाटा
पिंपरी |महाईन्यूज|
चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात टप-या, पत्राशेड, भंगार दुकानांचे अतिक्रमण वाढत आहे. त्यातील चिखली वडाचा मळा परिसरातील पत्राशेडवर आज महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकांने कारवाई केली. यामध्ये दीड लाख स्वे. फूट पत्राशेड जमिनदोस्त करण्यात येत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांकडून ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अतिरिक्त आयुक्त अजित पवारांनी त्याचे आदेश धुडकावत ही धडक कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात अनधिकृत टपर्या, पत्राशेड यामुळे बकालपणा वाढला आहे. विशेषतः भोसरी, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरामध्ये या अनधिकृत टपर्या आणि पत्राशेड, भंगार दुकानांची संख्या सर्वात जास्त आहे. बेकायदेशीर अतिक्रमण वाढत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे गुंडगिरीचे प्रमाण आणि हफ्तेखोरीचे प्रमाण वाढले आहे. चिखली, कुदळवाडी परिसरातील प्लॅस्टीक व्यावसायिकांनी केमिकल्सयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडल्यामुळे प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. या परिसरातील नागरिक थेट पंतप्रधानाकडे तक्रार करत आहेत. मात्र महापालिका आपली जबाबदारी टाळत होते. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपायुक्त मनोज लोणकर, तीन कार्यकारी अभियंता, पाच उपअभियंता, दहा कनिष्ठ अभियंता, 25 बीट निरीक्षक, शंभर मजूर अशा फाैजफाटा घेवून पत्राशेडवरील कारवाई सुरु करण्यात आली. परंतू, राजकीय वरदहस्त असलेल्या अतिक्रमणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन ही कारवाई केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
याकडे पण लक्ष द्या …
जाधववाडी चिखली लिंक रोड, बोऱ्हाडे वाडी ते उपबाजार चौक या रस्त्यावरील पदपथ, पुणे नाशिक महामार्गावरील जय गणेश साम्राज्य ते मोशी टोल नाका या रस्त्याच्या दुतर्फा फळांच्या हातगाड्या, राजा शिवछत्रपती चौक ते टाटा मोटर्स मटरेल गेट या दरम्यानच्या स्पाइन रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या पदपथांवर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, वीर सावरकर चौक ते पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आदी ठिकाणी अतिक्रमण केले आहे.