देहुरोडला पोलिसांचे कोम्बींग आॅपरेशन, रेकाॅडवरील 33 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/download-14.jpg)
पिंपरी – गुन्हेगारावर वचक रहावा यासाठी पोलिसांनी देहुरोड परिसरामध्ये गुरुवारी पहाटे कोम्बींग ऑपरेशन केले. यावेळी ३३ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.
देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे देहूरोडमधील गांधीनगर आणि आंबेडकर नगर परिसरात पाोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. या परिसरातील रेकॉर्डवरील ५२ सराईत गुन्हेगारांना पैकी ३३ जण मिळून आले. या गुन्हेगारांची चौकशी करण्यात येणार असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून काहींनी हा परिसर सोडून पलायन केले.
सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक व देहूरोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण दोनशे पोलीस सहभागी झाले होते.