Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दुष्काळी भागातील शेतक-यांच्या मदतीसाठी पिंपरीतून एक लाखाची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/fedration-press-Photo.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – दुष्काळी भागातील शेतक-यांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडच्या सदस्या ज्योती तेलंग यांनी स्वतःच्या उद्योग निधीतून एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.
सध्या मराठवाडा, विदर्भात दुष्काळ आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी नाही. शेतकरी हताश झाला आहे. त्यांना हातभार लावण्याची भावना मनात ठेवून ज्योती तेलंग यांनी सहकार्याचे पाऊल उचलले. त्यांनी स्वतःच्या उद्योग निधीतून 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी फेडरेशनचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष सतिश तेलंग, मंगेश धुमाळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले.