दीड वर्षाच्या मुलीसह महिला पोलिस बंदोबस्तावर
![Death threats from former mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pimpri-chinchwad-police-commissionarate.jpg)
पिंपरी – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने “लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. या काळात सरकारने केलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कामशेतमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या वेळी अस्मिता प्रकाश इंगवले या महिला पोलीस कर्मचारी आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह बंदोबस्तावर कार्यरत असल्याचे आढळून आले.
लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आपली सुरक्षा पणाला लावून काम करत आहेत. तरी देखील लोक घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करूनदेखील लोक ऐकत नाहीत. त्यामुळे शासनाकडून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आता तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन घरातच थांबावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
महिला पोलीस कर्मचारी आपल्या दीड वर्षाच्या बाळासह बंदोबस्तावर कार्यरत असल्याचे समजताच कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी या बाळाच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस कर्मचारी अस्मिता इंगवले यांना पोलीस ठाण्यातील काम दिले आहे. त्यामुळे त्यांना त्या आपल्या बाळाची काळजी घेऊन काम करण्यास मदत होणार आहे.