Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दिवाळीनिमित्त चापेकरवाडा १५१ दिव्यांनी उजळला; नागरिकांची गर्दी
पिंपरी | प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त चिंचवडगावातील चापेकर वाड्यात दिवे लावण्यात आले. १५१ दिव्यांच्या प्रकाशाने चापेकरवाडा उजळून निघाला. चापेकर वाड्याचे नेत्रदीपक रूप पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
चिंचवडगावात शुक्रवारी (दि.१३) झालेल्या कार्यक्रमाला क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सह कार्यवाह रवी नामदे, सदस्य गतीराम भोईर, निता मोहिते, नितीन बारणे, अशोक पारखी, सुनीता घोडे, आदी उपस्थित होते.
आज धनत्रयोदशी आहे. खऱ्या अर्थाने आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीनिमित्त चापेकर वाडा दिव्यांनी उजळून निघाला. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे उपस्थित मास्कचे वाटप करण्यात आले.