breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिल्लीतील ‘आप’च्या महापालिका शाळांचे माॅडेल पिंपरी चिंचवडमध्ये राबविणार

दोन दिवस सर्वपक्षीय पदाधिकारी करणार पाहणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘महापालिका शाळा’ आणि ‘मोहल्ला क्लिनिक’ योजनांची पाहणी पिंपरी चिंचवडचे सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचे पदाधिकारी करणार आहेत. शहरातील महापालिका शाळा व  प्रभागातील दवाखान्यांचा दर्जा, गुणवत्ता, सोयी-सुविधा सुधारण्यासाठी दोन दिवसीय पाहणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी रविवारी दिल्लीला रवाना होणार आहेत.  

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षण सभापती सोनाली गव्हाणे यांच्यासह शिक्षण समिती सदस्य हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर रविवारी सायंकाळी पुण्यातून विमानाने जाणार असून सोमवार आणि मंगळवार दोन दिवस पाहणी करणार आहेत.

दिल्लीतील पालक आपल्या मुलांना खासगी शाळेतून काढून सरकारी डिजिटल शाळेत टाकत आहेत. एवढा चांगला दर्जा तेथील सरकारी शाळांचा आहे. दुसरीकडे खासगी शाळांच्या तुलनेत अधिक साधनसामग्री व सोयीसवलती देऊनही पालिका शाळांचा दर्जा दिवसागणिक पिंपरीत घसरत चालला आहे. मराठी शाळांचा पट वेगाने घसरतो आहे. परवडत नसूनही कष्टकरी आपल्या मुलाला खासगी शाळेत टाकतो आहे. त्यामुळे पालिका शाळा दर्जेदार करण्यासाठी आपच्या दिल्लीतील डिजिटल शाळा पाहण्याचे भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी पालिकेने ठरविले आहे. तसेच ते यावेळी दिल्लीकरांना घरपोच मिळत असलेल्या सरकारी वैद्यकीय सेवेचीही पाहणी करणार आहेत. दिल्लीतील हे मोहल्ला दवाखान्यातील कर्मचारी आपली सेवा रुग्णाच्या घरी जाऊन अतिशय उत्कृष्टपणे देत आहेत. दुसरीकडे पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय सेवेचे तीनतेरा वाजलेले आहेत. शहरात सध्या डेंगी व स्वाइन फ्लूचा कहर सुरू आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या मोहल्ला दवाखान्याचीही पिंपरी पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी पाहणी करून ते पिंपरीत सुरू करता येतील का ते पाहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button