दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केला वडिलांचा खून
![Massacre in Gondia! The accused killed himself by killing three](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/murder-1_201707279.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांच्या डोक्यात तांब्याची घागर मारुन वडिलांचा खून केला. याप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली. याबाबत आरोपीच्या आजीने पोलिसात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 1) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वेताळनगर, चिंचवड येथे घडला.
संजय तानाजी सोलंकर (वय 30, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक आरोपी नाव आहे. चंद्रभागा सतबा सोलंकर (वय 70) असे तक्रार दिलेल्या आजीचे नाव आहे. तानाजी सतबा सोलंकर (वय 52) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय याला दारूचे व्यसन आहे. तो रविवारी (दि. 1) रात्री साडेसात वाजता दारू पिऊन घरी आला. त्याने वडिलांकडे आणखी दारू प्यायला पैसे मागितले. वडील तानाजी यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून संजय याने वडिलांच्या डोक्यात घरातील तांब्याची घागर मारली. यामध्ये तानाजी गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.