breaking-newsपिंपरी / चिंचवड

दारू पिण्यापासून रोखणाऱ्या पत्नीचा खून

पिंपरी – दारु पिण्यापासून रोखणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून खून केला, त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नीचा मृतदेह मोशी येथील डोंगरात झाडीमध्ये टाकून दिला. ही घटना 17 ऑक्‍टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी, पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंकी संतोष सप्रे (वय-27) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, संतोष नेमुराम सप्रे (वय-32, रा. सोनपुरी, रा. छत्तीसगड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष हा मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असून तो मागील काही दिवसांपासून कामासाठी पुण्यात आलेला आहे. संतोष याला त्याची पत्नी आवडत नसे. तसेच संतोष याला दारुचे व्यसन होते. त्याची पत्नी त्याला दारु पिण्यापासून रोखत होती. या गोष्टीचा राग येत होता. याच कारणावरुन त्याने त्याची पत्नी पिंकी हिला शुभलक्ष्मी मार्बल ऍण्ड ग्रेनाईट दुकानाच्या मागे नेले व त्या ठिकाणी तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत डोंगरावर ओढत नेत झुडपात टाकून दिले.

याप्रकरणी, 23 ऑक्‍टोबर रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी याचा तत्काळ तपास करीत आरोपीचा शोध घेतला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button