दापोडी ते पिंपरी लोहमार्गावर खडी भरण्याचे काम; प्रवासी वाहतुकीवर परिणाम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/IMG_20180922_142230.jpg)
पिंपरी – दापोडी ते पिंपरी रेल्वे मार्गावर रुळाच्या दोन्ही बाजुला खडी भरण्याचे काम सुरू असल्यामुळे आज शनिवारी (दि. 22) पुण्याहून लोणावळ्याला जाणा-या दुपारच्या काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, लांब मार्गाच्या गाड्यांच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे.
तब्बल दहा वर्षानंतर लोहमार्गाच्या दोन्ही बाजुला खडी लेवल करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जाते. कामगारांद्वारे खडी भरून त्याची लेवल रेल्वेच्या मशिनद्वारे केली जात आहे. हे काम दापोडी ते पिंपरी या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कामाचा आजचा शेवटचा दिवस असून सध्या पिंपरीतील डेअरी फार्म याठिकाणी हे काम करण्यात येत आहे. 20 ते 25 कर्मचारी खडी भरण्याचे काम करत आहेत. त्यानंतर मशिनद्वारे रुळाच्या समांतर खडी लेवल करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या कर्मचा-याने सांगितली.