breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा दाबून हत्या

महाईन्यूज | पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दापोडी येथे एका १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेआठ च्या सुमारास उघडकीस आली आहे. तिच्या सोबत काही अघटित घडलं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालात ते स्पष्ट होणार आहे व या प्रकरणी संशयित सावत्र बाप फरार आहे. त्याचा शोध भोसरी पोलिस घेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दापोडी येथील परिसरात राहते. आई, बहीण आणि सावत्र वडील अस तीचे कुटुंब आहे. बहीण शाळेतून आली तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. बहिणीने इतरांना फोन करून चावीची विचारणा केली. त्यानंतर मात्र कुलूप तोडले, त्यानंतर धक्कादायक घटना समोर आलेली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरात आढळला, तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय भोसरी पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. या घटने प्रकरणी सावत्र बाप मात्र फरार आहे. त्यामुळे भोसरी पोलिसांचा सावत्र बापावर संशय बळावला गेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button