breaking-newsपिंपरी / चिंचवड
दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रम येथे अन्नधान्य व भाजीपाला वाटप
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे संपुर्ण भारतामध्ये लाॅकडाऊन जाहिर झाले आहे. गरजू व गरीबाची जीवन जगणे अवघड झाले आहे. हिच बाब लक्षात घेता शिवसेना माजी शहर प्रमुख रामभाऊ मारुती उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेतर्फे दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रम येथे अन्नधान्य व भाजीपाला वाटप करण्यात आले.
यावेळेस पिंपरी युवासेनाचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला शीला मामी जाधव, सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता अडसूळे, जयंती गायकवाड, संतोष आढाव, सोन्या तुळवे, मछिंद्र नेटके उपस्थित होते.
रामभाऊ उबाळे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रम अन्नधान्य व भाजीपाला वाटप