दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज online भरावेत
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावेत, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, संपूर्ण देशाला राज्याला तसेच महानगर यांनाही कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने ग्रासले आहे. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. केंद्र् सरकार राज्य सरकार आपापल्या परीने उपाय योजना करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला तर मुंबई पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या योजनांच्या बाबतीत ही काही उपाययोजना कोरोना परिस्थितीच्या दृष्टिकोनातून केल्या पाहिजेत.
आपण सालाबाद प्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे इयत्ता दहावी व बारावी तील विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे शिष्यवृत्ती 15,000 व 25 ,000 अशाप्रकारे देण्यात येते. तरी, यंदा ही शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात यावी. या शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरण्याची मुभा पालकांना देण्यात यावी. जेणेकरून कोरोना सारख्या साथीच्या प्रादुर्भावास अटकाव बसेल, असे बाबर यांनी म्हटले आहे.
याव्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने जास्तीत जास्त कोरोना टेस्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या लवकरात लवकर कशा होतील याबाबतहीी प्रशासनाने विचार करावा व रुग्णांसाठी बेडस , वेंटिलेटर वाढवावे अशी प्रशासनास माझी नम्र विनंती.