breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दहशत माजवणा-या रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला अटक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली आहे. वाकड येथील कस्पटे वस्ती याठिकाणी आज शनिवारी (दि. 18) ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

विक्रांत सुभाष कांबळे (वय 20, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कस्पटेवस्ती कडून हिंजवडीच्या दिशेने बुलेट वरून जात आहे. त्याच्याकडे पिस्तुल आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक हनुमंत बांगर यांना मिळाली होती. त्यानुसार वाकड पोलिसांनी वाकड ब्रिज येथे सापळा रचून विक्रांत याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

विक्रांतची चौकशी केली असता तो देहूरोड परिसरातील रावण साम्राज्य टोळीतील सदस्य असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी विक्रांतला बेड्या ठोकल्या. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button