breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दत्ता काका साने स्पोर्ट्स फाउंडेशनकडून जखमी खेळाडुला उपचारासाठी आर्थिक मदत
पिंपरी / महाईन्यूज
दत्ता काका साने स्पोर्ट्स फाऊंडेशन व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश दत्ता काका साने यांच्यातर्फे युवा खेळाडूला आर्थिक मदत देण्यात आली.
कब्बडी मॅच खेळताना जखमी झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर कब्बडीपटू राधा विलास मोरे हिला पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांच्यातर्फे रोख दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली.
राधा ही ज्युनिअर नॅशनल प्लेअर असून तिने खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तिचे वडील झाडू खात्यात कामाला असून खेळताना जखमी झाल्यामुळे तिला तातडीच्या उपचाराची गरज होती. परंतु, आर्थिक परिस्थतीमुळे उपचार करण्यात अडचण येत होती.
यश साने यांच्यातर्फे आर्थिक मदत देण्यात आल्याने मोरे कुटुंबियांकडून आभार व्यक्त करण्यात आले.