Breaking-newsपिंपरी / चिंचवड
थरमॅक्स चौकात विचित्र अपघात; सुदैवाने जिवितहानी टळली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/akurdi.jpg)
पिंपरी:- आकुर्डीतील थरमॅक्स चौकात आज (मंगळवार) दुपारी एक ते दीडच्या सुमारास नादुरुस्त ट्रकला टोईंग लावून घेवून जाण्यात येत होते. यावेळी अचानक ट्रकचा टोईंग रॉड तुटल्याने ट्रक नियंत्रणा बाहेर गेला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच रिक्षांना धडकला.
यावेळी मोकळी रिक्षा (क्र.एमएच/१४/जीसी/७७४२) ट्रक खाली सापडल्याने ट्रक थांबला आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. मात्र रिक्षाचालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहतुक पोलिस तपास करत आहेत.