तोतया पोलिसांचा उपद्रव वाकड पोलिसांच्या मुळावर, दोघांना ठोकल्या हातकड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/716092-fake-cop.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
वाकडमध्ये तोतया पोलिसांनी पादचाऱ्यांच्या खिशातील पैसे उकळल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या दोन तोतया पोलिसांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना 28 आणि 29 फेब्रुवारी 2020 रोजी काळेवाडी येथे घडली.
आशिष अशोक खरात (वय 24, रा. इंद्रलोक कॉलनीमी चिंचवड), मिलिंद अशोक सूर्यवंशी (वय 24, रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसांची नावे आहेत. याप्रकरणी अतिश चंद्रकांत भोसले (वय 34, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी रविवारी (दि. 1) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतिश हे 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास काळेवाडी येथील एम्पायर इस्टेट पुलाजवळ थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. तसेच, 29 फेब्रुवारी रोजी आरोपीने पोलीस असल्याचे सांगून पुष्पेंद्र कोमलप्रसाद गौतम (वय 29, रा. नढेनगर, काळेवाडी) यांच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्ती काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.