breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तिस-या फेरीनंतरही आरटीईच्या २६९ जागांकडे पालकांची पाठ 

  • मोफत प्रवेश प्रक्रिया : ३१३६ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आरटीई कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. शासनाच्या वतीने आॅनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली.  पिंपरी-चिंचवड विभागातून ३४०५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून, २६ जुलै प्रवेशाची अंतिम तारीख होती. यापैकी २६० जागांवर प्रवेश न झाल्याने या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

आरटीई प्रवेशपात्र असलेल्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये पिंपरी-चिंचवड विभागामध्ये १७६ शाळा होत्या. त्यामध्ये ३४०५ जागांसाठी पालकांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीमध्ये ३२५७ विद्यार्थ्यांना लॉटरी लागली. त्यामधील २१३५ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतला. दुसºया फेरीमध्ये लॉटरी लागलेल्या १३७४ विद्यार्थ्यांपैकी ७७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर तिसºया फेरीमध्ये ४९५ जणांची सोडत निघाली त्यापैकी २२६ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.

तीन फे-यानंतर एकूण ३१३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर २६९ विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने २४ जुलै प्रवेशाची अंतिम तारीख ठरविण्यात आली होती. मात्र अनेक पालकांनी प्रवेश घेतले नसल्याने दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली होती. मुदतवाढ देऊनही २६९ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या वतीने कागदपत्र पडताळणीसाठी उन्नत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. प्रवेश पात्र पालकांच्या मोबाइलवर एसएमएसही पाठविण्यात आले होते. मात्र तरीही काही पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button