breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ताथवडेत 19 वर्षीय तरुणाचा खून

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – धारदार शस्त्राने डोक्यात, मानेवर आणि पोटात गंभीर वार करुन 19 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

जुबेर गुलाब मुजावर (वय १९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वडील गुलाब मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बालाजी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ताथवडे येथे एक तरुण बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जुबेरच्या डोक्यात, मानेवर आणि पोटावर धारदार हत्याराचे वार केल्याच्या खूना आहेत. जुबेर याचा खून कोणी आणि का केला याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button