breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगावातील मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाडोत्री गर्दी?

शंभरहून अधिक बाहेरच्या बस ; सभास्थळी आळंदी, चाकण एमआयडीसीतील कामगार

पिंपरी – मावळ मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी तळेगावात झालेल्या सभेला भाडोत्री गर्दी जमा केल्याचा प्रकार समोर आला आहे.  सुशील कार्यालय, निंब फाटा तसेच सभेच्या परिसरात मावळ तालुक्याच्या बाहेरील 72 वाहने उभी केल्याचे तसेच हिंदी भाषकांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मतदारसंघात सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे.

मावळ मतदारसंघातील भाजपा महायुतीकडून बाळा भेगडे तर राष्ट्रवादी महाआघाडीकडून सुनील शेळके हे विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेळके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची तळेगावात ऐतिहासीक सभा झाली होती. या सभेने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याने मुख्यमंत्र्यांची सभा कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी सायंकाळी झालेली ही सभा गर्दीअभावी एक तास उशीराने सुरू करावी लागली. सभेला गर्दी होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर संयोजकांनी चाकण, तळेगाव एमआयडीसीतील कामगारांसह मतदारसंघाच्या बाहेरील गर्दी जमविल्याची चर्चा सभास्थळी रंगली होती.

सभेला आलेल्या वाहनांमध्ये एमएच 01, एमएच 43, एमएच 06, एमएच 04, एमएच 23 यासह बाहेरील वाहनांचाच अधिक भरणा होता. विशेष बाब म्हणजे सभास्थळी हिंदी भाषकांची संख्याही अधिक होती. मतदारांपासून दुरावलेल्या भाजपा उमेदवाराला मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी भोडोत्री माणसे आणावी लागल्याने मावळमध्ये राष्ट्रवादीचाच बोलबाला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भाजपची लोणावळ्यातील सभाही अयशस्वीलोणावळ्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेला अत्यंत कमी प्रतिसाद लाभल्याने ती सभाही यशस्वी झाली नव्हती. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेलाही भाडोत्री गर्दी करावी लागल्याने मावळात यंदा कमळाच्या पाकळ्या गळून जाणार,अशीच चर्चा रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button