breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…तर, शितल शिंदे यांचाच ‘विजय’

  • मयूर कलाटे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार
  • भोसरीचा गट नाराजीचे उट्टे काढणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी विजय उर्फ शितल शिंदे यांना शब्द देऊन ऐनवेळी विलास मडिगेरी यांना पुढे करत भाजप नेत्यांनी मोठी खेळी केली आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शितल शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात जाऊन स्वतःचा अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भोसरीच्या नाराज गटाचा पाठिंबा मिळाल्यास शितल शिंदे यांचा ‘विजय’ निश्चित होणार आहे. परंतु, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर कलाटे केंद्रस्थानी मानले जात आहेत. त्यांनी मागार घेतल्यास स्थायीवर विजयोत्सव होणार यात शंका नाही.

भाजपकडून स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी शितल शिंदे यांच्याबरोबर संतोष लोंढे यांचे देखील नाव चर्चेत होते. दोघांनाही फाट्यावर मारून पक्षाने विलास मडिगेरी यांना पायघड्या घातल्या आहेत. त्यामुळे भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाचे स्थायीतील समर्थक नाराज झाले आहेत. ही नाराजी बंडखोर उमेदवाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादीतर्फे मयूर कलाटे यांचा अर्ज दाखल झाला असला तरी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी बंडखोर शिंदे यांना खुला पाठिंबा दर्षविला आहे. साने यांच्या सांगण्यानुसार मयूर कलाटे कोणत्याही क्षणी निवडणुकीतून मागार घेतील. त्यानंतर शिंदे आणि मडिगेरी यांच्यात खुली लढत होईल. यात भोसरीचा नाराज गट मडिगेरी यांच्या बाजुने जाईलच असे म्हणता येणार नाही. परंतु, त्यांच्याही काळजावर वर्मी घाव बसला आहे. याचा वचपा काढण्याची त्यांनी नामी संधी साधल्यास मडिगेरी यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

या संधीचा फायदा घेऊन आमदार महेश लांडगे यांच्या नाराज समर्थकांचा शिंदे यांना पाठिंबा मिळू शकतो. कारण, मडिगेरी आणि लांडगे समर्थकांत कायमच धुसफूस असते. त्यामुळे लांडगे समर्थक मडिगेरी यांच्या बाजुने उभे राहतील असे वाटत नाही. त्यांचा पाठिंबा मिळविण्यात शितल शिंदे यशस्वी झाल्यास स्थायी समिती अध्यक्ष पदी शितल शिंदे यांचा विजय निश्चित होणार आहे.


भोसरीची मते ठरणार निर्णायक

मयूर कलाटे यांनी निवडणुकीतून मागार घेतल्यास त्यांचे स्वतःचे एक मत त्याचबरोबर प्रज्ञा खानोलकर, पंकज भालेकर, गीता मंचरकर, शिवसेनेचे राहूल कलाटे आणि भोसरी गटाचे नम्रता लोंढे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे आणि विजय उर्फ शितल शिंदे यांचे अशी नऊ मते मिळाल्यास शिंदे यांचा स्थायी अध्यक्ष पदावर विजय निश्चित होणार आहे. यात भोसरीची मते निर्णायक ठरणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button