… तर नगरसेवक ओव्हाळ यांनी राजीनामा द्यावा.
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा टोला
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांना भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येयधोरणे पटत नसतील, तर त्यांनी नगरसेवक पदांचा राजीनामा द्यावा, तसेच भाजप विरोधात निवडून येवून दाखवावे, असे खुले आव्हान सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
महापालिकेचे प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आणि रिपाइंच्या जागेवर (आठवले गटाचे) नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ हे निवडून आले आहेत. ते म्हणाले की, भाजपच्या राजवटीत देशात दलितांवर होणारे अन्याय, अॅट्रासिटी कायद्यात केलेली शिथिलथा आणि भिमा कोरेगांवमध्ये दलितावर केलेल्या दगड फेकीतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. यासह विविध प्रश्नावर पिंपरी-चिंचवड नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपच्या राजकारणापासून अलिप्त होवून त्याच्या पापातून मुक्त होणार असल्याची घोषणा आज (मंगळवारी) केली.
याविषयी बोलताना पक्षनेते पवार म्हणाले की, भारतीय जनता पार्टीकडून दलित समाजावर कुठलाही अन्याय केला जात नाही. उलट देशातील दलित वस्तीत जावून भाजपचे खासदार तेथील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मुक्काम करीत आहेत. तसेच गल्लीतील नगरसेवकांनी देशातील प्रश्नावर बोलताना विचारपुर्वक बोलावे, जर भाजपचे विचार पटत नसतील, तर त्यांनी भाजपच्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, तसेच भाजपच्या विरोधात निवडून येवून त्यांनी दाखवावे, असे आव्हान त्यांनी केले आहे.