breaking-newsपिंपरी / चिंचवड

…तरच स्व. दत्ता (काका) साने यांना खरी श्रध्दांजली ठरेल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कोरोना लॅबला आणि भोसरी रुग्णालयाला माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ता (काका) साने यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

माजी विरोधी पक्षनेते दत्ता (काका) साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. साने यांचे शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. गोरगरिबांसाठी त्यांची अग्रही भूमिका असायची. नागरिकांना योग्य व माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण रोखले. स्व. दत्ता (काका) साने यांचे हे योगदान शहरातील प्रत्येक नागरिक विसरू शकणार नाही.

तथापि, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वायसीएम रुग्णालयातील ‘कोव्हिड टेस्टिंग लॅब’ला आणि ‘भोसरी रुग्णालय’ला स्व. दत्ता (काका) साने यांचे नाव देण्याचा निर्णय घ्यावा. त्यांचे नामकरण केल्यास दत्ता (काका) साने यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी नगरसेवक कामठे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button