breaking-newsपिंपरी / चिंचवड
तपासणीच्या बहाण्याने विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात
![Kidnapping of a goldsmith claiming to be an "income tax" officer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Crime.jpg)
पिंपरी – पैशासाठी वारंवार त्रास देऊन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच सासरच्या मंडळींनी विवाहितेला तपासणीचा बहाणा करून जबरदस्तीने गर्भपात केला.
याप्रकरणी ३० वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती प्रतिक सुर्यकांत कदम (वय ३०), दिर प्रणव सुर्यकांत कदम (वय २४, तिघे रा. सिल्व्हर केस्ट, वाकड), सासू सुवर्णा सुर्यकांत कदम (वय ५०), सासरे सुर्यकांत कदम (वय ६०, दोघे रा. राखी वसंत उत्सव सोसायटी, कांदीवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीकडे आरोपींनी वारंवार पैशांची मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केला. आरोपी पती, दिर व सासूने फिर्यादी या गरोदर असताना तपासणीचा बहाणा करून जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. तसेच दिर प्रणवने विवाहितेचा विनयभंग केला. फौजदार शेटे तपास करत आहेत.